महाराष्ट्र सरकारने माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या वृत्तांची सत्यता पडताळण्यासाठी आणि दिशाभूल करणाऱ्या अथवा चुकीच्या माहितीवर त्वरित प्रत्युत्तर देण्यासाठी एक ठोस निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शुक्रवारी यासंदर्भात परिपत्रक जारी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, राज्य सरकारच्या प्रतिमेच्या संवर्धनासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. परिपत्रकानुसार, राज्य सरकारच्या प्रत्येक विभागातील सहसचिव किंवा उपसचिव स्तरावरील अधिकाऱ्यांना संबंधित माध्यमगृहांना त्वरित स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी सोपवली जाणार आहे. तसेच, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाला (DGIPR) दिशाभूल करणाऱ्या किंवा चुकीच्या बातम्या संकलित करून संबंधित विभागांकडे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या निर्णयाद्वारे महाराष्ट्राने कर्नाटक आणि तामिळनाडूसारख्या राज्यांचे अनुकरण केले आहे. या राज्यांनी २०२३ मध्ये अशाच स्वरूपाचे तथ्य-तपासणी युनिट्स स्थापन करून चुकीच्या माहितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता. केंद्र सरकारनेही २०१९ मध्ये प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) अंतर्गत असे युनिट स्थापन केले होते.
५ मार्च रोजी महाराष्ट्र सरकारने माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाला अंतर्गत एक विशेष विभाग स्थापन केला आहे, जो प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या सरकारसंबंधी बातम्यांचे विश्लेषण करेल. त्यानंतर त्या वृत्तांची तथ्य पडताळणी करून आवश्यक असल्यास अधिकृत स्पष्टीकरण जारी करणे बंधनकारक असेल. यासाठी राज्य सरकारने प्रत्येक विभागात सहसचिव किंवा उपसचिव स्तरावरील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
जर एखाद्या वृत्तवाहिनी किंवा वृत्तपत्राने चुकीची माहिती प्रसिद्ध केली, तर माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाला त्याचा संक्षिप्त आढावा घेऊन संबंधित सचिवांकडे पाठवेल. त्यानंतर संबंधित विभाग त्या वृत्ताची सत्यता पडताळून अहवाल तयार करेल आणि माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाला कडे सुपूर्त करेल. हा अहवाल त्याच दिवशी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयालाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केला जाईल, तसेच संबंधित माध्यमसंस्थेला स्पष्टीकरण पाठवले जाईल.
“प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या अवास्तव अथवा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांना तातडीने उत्तर देणे आवश्यक आहे,” असे मुख्य सचिवांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय, केंद्र सरकारशी संबंधित चुकीच्या किंवा दिशाभूल करणाऱ्या वृत्तांचा आढावा घेऊन त्यासंबंधी आवश्यक कारवाईसाठी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो कडे पाठवण्याचे काम माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाला करणार आहे.
Leave a Reply