मुंबई महापालिकेची वैयक्तिक स्वच्छता कचरा संकलनासाठी नवी योजना; १ मेपासून अंमलबजावणी, नोंदणी प्रक्रिया सुरू

बृहन्मुंबई महानगरपालिकेने वैयक्तिक स्वच्छता व सॅनिटरी कचऱ्याच्या संकलनासाठी स्वतंत्र सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून, ही सेवा येत्या १ मे २०२५ पासून प्रत्यक्ष कार्यान्वित होणार आहे. यासाठी नोंदणी प्रक्रिया २२ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स, टॅम्पॉन्स, कालबाह्य औषधे, दूषित कापूस, बँडेजेस, सुई, रेझर ब्लेड्स, वॅक्सिंग स्ट्रिप्स तसेच इतर स्वच्छतासंबंधी धोकादायक वस्तूंचे संकलन केले जाणार आहे. हा कचरा अनेकदा दुर्लक्षित राहतो व इतर कचऱ्यात मिसळल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपआयुक्त किरण दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली ही सेवा राबवली जाणार आहे. मुंबईत दररोज तयार होणाऱ्या ७ ते ८ हजार टन कचऱ्यातून सुमारे ७० ते ८० टन कचरा हा वैयक्तिक स्वच्छतेशी संबंधित असतो. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्थापनाची गरज ओळखून महापालिकेने ही महत्त्वाची पाऊल उचलले आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी गृहनिर्माण संस्था, निवासी सोसायट्या, ब्यूटी पार्लर्स, महिला वसतिगृहे आणि शैक्षणिक संस्था यांना खालील लिंकवर नोंदणी करता येईल:

🔗 Link

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc6zR8XHoOzXRNanCCdj4oKtS27Iu7vuaXBANiCGoKCfUCn5g/viewform

नोंदणीनंतर संबंधित संस्थांना QR कोड पाठवण्यात येईल, ज्याच्या माध्यमातून सहज सेवा सक्रिय करता येईल. पिवळ्या रंगाच्या पिशव्या या कचऱ्यासाठी वापरण्यात येणार असून, योग्य विलगीकरणाची माहिती संस्थांना प्रत्यक्ष भेटीद्वारे दिली जाणार आहे, असे उपआयुक्त दिघावकर यांनी स्पष्ट केले. या योजनेमुळे केवळ कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापनच साधले जाणार नाही, तर स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही सुरक्षितता सुनिश्चित केली जाणार आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *